इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील (आयआयएम) प्रवेशासाठी घेण्यात येणार्या कॅट परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. मुंबईतील डोंेबिवलीच्या शशांक प्रभू आणि अंबरनाथ येथील अंजिक्य देशमुख यांनी १00 टक्के पर्सेटाईल गुण मिळवून टॉपरमध्ये बाजी मारली आहे.
आर्त प्रेमाची गोष्ट!
अनघा दिघे , रविवार , ८ जानेवारी २०१२
(आदिवासी लोककथा)
फार पूर्वीची गोष्ट आहे. एका रानात एक शिकारी शिकार करण्याकरता गेला होता. उमदा, देखणा. त्याच्या डोळ्यांत स्वत:च्या शिकारीच्या कौशल्याबद्दल अभिमान होता! त्याला आस होती शौर्याची.. महान कृत्ये करून दाखविण्याची! रात्री शिकारीची जय्यत तयारी करून तो उमदा शिकारी रानात गेला. रात्रीच्या अंधुकशा प्रकाशात त्याला एक काळवीट दिसले. काळसर हिरवी त्वचा. त्यावर मोठमोठे बासुंदी रंगाचे ठिपके. आणि आकर्षक डौलदार िशगे असलेले ते काळवीट कुणालाही हर्षभरित करेल इतके सुंदर होते.