अभिनेता अजय देवगण कोल्हापुरात
आता माझी सटकली.. म्हणत आपल्या सिंघम स्टाईलने बॉलीवूडसह तरुणाईला वेड लावलेला सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगण याने करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले.
लोकलट्रेनमधून पडलेल्या धनश्रीने सोडवला बारावीचा पहिला पेपर
मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) - बारावीचा पहिला पेपर देण्यासाठी धनश्री गायकवाड आपल्या काकांसोबत डोंबिवलीहून लोकलने निघाली. दादर स्थानकावर उतरताना ती लोकलमधून पडली. सुदैवाने जीव वाचला. पण उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. पेपर कसा सोडवायचा? वर्षभराची मेहनत पाण्यात. असे नाना विचार मनात येत असतानाच शारदाश्रम विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका आणि नातेवाईक यांनी अवघ्या काही मिनिटांत केलेल्या धावपळीमुळे ?रायटर? मिळाला आणि असह्य वेदना होत असतानाही धनश्रीने पेपर सोडविला.
बारावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरूवात
भावी आयुष्याची दिशा ठरविणारी बारावीची परीक्षा (२१ फेब्रुवारीपासून) सुरू होत आहे. वर्षभर बारावीच्या अभ्यासात तुम्ही स्वत:ला बुडवून घेतले असेल. आता या अभ्यासाचा कस परीक्षेत लावण्याची वेळ आली आहे. अभ्यासाचा ताण येऊ नये म्हणून परीक्षा मंडळाने तुम्हाला प्रत्येक पेपरनंतर एक दिवसाचा ?ब्रेक? देऊ केला आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि कोणतेही दडपण अथवा नैराश्य येऊ न देता शांतचित्ताने आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा! बारावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!